Join with us

Friday, 22 July 2011

राईट क्लिक व कॉपी पेस्ट बंद केलेले असताना इमेल सबस्क्रिप्शनचा पर्याय कसा द्यावा

How to offer email subscription of a blog when right click and copy paste is disable - In English.

इमेल सबस्क्रिप्शनचा पर्याय ब्लॉगर आणि वाचक या दोघांनाही कसा वापरायचा हे आपण मागच्या लेखात पाहिलं. पण जर ब्लॉगरने जर कॉपी-पेस्ट व राईट क्लिक रोधक कोड लावला असेल, तर सबस्क्रिप्शनची खिडकी असूनही काही उपयोग नसतो. अशा वेळेस वाचकांना एक युक्ती करता येईल.

या खिडकीखालचं Subscribe असं लिहिलेलं बटण पहा

Delivered by FeedBurner
जर त्या खिडकीत इमेल आयडी कुठल्याही प्रकारे लिहिला जात नसेल, तर खाली जे Subscribe बटण दिलेलं असतं, त्याच्यावर क्लिक केलं तर एक नवीन खिडकी उघडेल, ज्यात वाचक आपला इमेल आयडी देऊन सबस्क्रीप्शनची मागणी करू शकतील. बाकीची प्रक्रिया आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे पूर्ण होते.

पण प्रत्येक वाचकाला ही युक्ती माहित असेलच असं नाही. त्यामुळे ब्लॉगरनेच आपल्या ब्लॉगवर इमेल सदस्यतेसाठी सोयिस्कर पडेल असा पर्याय वाचकांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. जिथे ब्लॉगचे फीड्स कार्यान्वित होतात त्या फीडबर्नरवर गेल्यास, मेन्यू बार मधे Analyze Optimize Publicize असे पर्याय असतात. यातील Publicize या पर्यायामधेच त्या रिकाम्या खिडकीची सुविधा उपलब्ध करून देणारा एक मोठा कोड असतो. या कोडच्या अगदी खालीच Subscription Link Code ही सुविधा दिलेली आहे. तिथेदेखील एक लहानसा कोड असतो. काहीसा असा:

<a href="http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=YourblogTitleLink&loc=en_US">Subscribe to YourblogTitle by Email</a>

खाली दिलेल्या इमेजमधे हा कोड हिरव्या रंगात गडद करून दाखवला आहे.हा कोड जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून ब्लॉगवर लावला तरी चालतो. वाचकांनी या लिंकवर क्लिक केलं की एक नवीन विंडो उघडते.सबमिट बटण क्लिक केल्यावर जी विंडो उघडते, तीच ही विंडो असते. यात असलेल्या रिकाम्या खिडकीमधे वाचकांना आपला ईमेल आयडी लिहिता येतो व सहजरित्या इमेल सबस्क्रिप्श्नचा लाभ घेता येतो. बाकीची प्रक्रिया आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे पूर्ण होते.

No comments:
Write comments