Join with us

Friday, 22 July 2011

ईमेल सबस्क्रिप्शनचा पर्याय कसा द्यावा

How to offer email subscription of a blog - In English.

ब्लॉगचे फीड्स कार्यान्वित करून घेतले की वाचकांना ईमेलद्वारेदेखील त्या ब्लॉग लेखांच्या नोंदी मिळवता येतात. याला त्या ब्लॉगची सदस्यता घेणे अथवा सबस्क्रिप्शन घेणे असे म्हणतात. इमेलद्वारे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी वाचकाने आपला ईमेल आयडी देणे गरजेचे असते. बर्‍याच ब्लॉग्सवर अशा प्रकारे ईमेल आयडी देता यावा म्हणून खाली दिलेल्या प्रकारे एक सुविधा दिलेली असते.

खालच्या रिकाम्या खिडकीत वाचकाने ईमेल आयडी द्यायचा असतो

Delivered by FeedBurner
वर जशी एक रिकामी खिडकी दिसते आहे, तशा प्रकारच्या खिडकीमधे आपला ईमेल आयडी लिहून सबस्क्रिप्शनसाठी पाठवयाचा असतो. म्हणजे वाचकाला त्याच्या दिलेल्या ईमेल आयडीवर खाली दिलेल्या प्रकारे एक ईमेल येते.


या ईमेलमधे दिलेल्या लिंकवर क्लिक केलं की सदस्यत्वाची प्रक्रिया पूर्ण होते व ब्लॉगवर जेव्हा जेव्हा नवीन लेख प्रकाशित केला जातो, तेव्हा तेव्हा वाचकाला त्याची नोंद मिळत रहाते.

ही सुविधा ब्लॉगवर देता यावी म्हणून आधीच म्हटल्याप्रमाणे आपल्या ब्लॉगचे फीड्स कार्यान्वित असणे गरजेचे असते. पण ब्लॉगरने जर कॉपी-पेस्ट व राईट क्लिक रोधक कोड लावला असेल, तर वरील प्रकारे खिडकीची सुविधा देऊनसुद्धा काही उपयोग होत नाही, कारण रिकाम्या खिडकीत इमेल टाईप होतच नाही. अशावेळेस ब्लॉगर आणि वाचक या दोघांनाही सबस्क्रिप्शनसाठी काय करता येईल हे आपण पुढच्या लेखात पाहू.

No comments:
Write comments