Join with us

Thursday, 26 August 2010

मजकूर रंगीत कसा करावा

काही दिवसांपूर्वी प्रभाकर कुलकर्णी यांनी मला प्रतिक्रियेत प्रश्न विचारला होता की मजकुरात लिंक जोडून तो रंगीत देखील करायचा असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल. सर्वप्रथम आपण मजकूर रंगीत कसा करता येईल ते पाहू व मग त्यात लिंक कशी जोडायची हेही समजावून घेऊ.

मजकूर रंगीत करण्यासाठी ब्लॉगरमधेच सुविधा दिलेली आहे. ही सुविधा Edit Html व Compose अशा दोन्ही प्रकारांतून वापरता येईल. उदाहरणादाखल आपण श्री. कुलकर्णी यांनी सुचविलेलंच वाक्य घेऊ या:

जर आपल्याला ’अमुक गोष्ट करणे हे फार चांगले असते.’ या वाक्यातील ’अमुक’ हा शब्द वेगळ्या रंगात दाखवायचा आहे. तर आधी आपल्याला त्या शब्दासाठीचा रंग निश्चित करावा लागेल. समजा आपण लाल हा रंग ’अमुक’ शब्दासाठी निश्चित केला, तर आपल्याला Compose या प्रकारात वाक्य लिहित असताना अशा प्रकारे क्रमाक्रमाने पुढे जावे लागेल.

१. सर्वप्रथम वाक्य टाईप करण्यासाठी Compose पर्यायाचा वापर करावा लागेल.२. लिहिलेलं वाक्यातील ’अमूक’ हा शब्द माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यावा लागेल.३. फॉन्टचा रंग बदलता येणारा जो पर्याय आहे, त्यावर क्लिक करावं लागेल म्हणजे रंगांचे विविध पर्याय मिळतील.

४. या पर्यायांतून हव्या असलेल्या लाल रंगावर क्लिक केलं की सिलेक्ट केलेला शब्द किंवा मजकूर त्या रंगाचा दिसू लागतो.

आता हाच बदल आपण Edit Html मधे पाहिला तर खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसतो.या चित्रामधील red या शब्दावरून तुम्हाला कळलं असेलच की तिथे तुमच्या आवडीच्या रंगाचं नाव टाकलंत की लाल ऐवजी तुमच्या आवडीच्या रंगामधे मजकूर दिसू लागेल.

उदाहरणार्थ,

अमुक गोष्ट करणे हे फार चांगले असते.

या वरील वाक्यात

अमुक गोष्ट करणे हे फार चांगले असते.

असा बदल केला तर ’अमूक’ हा शब्द निळ्या रंगात दिसू लागेल.

अशा प्रकारे आपल्याला मजकूर किंवा विशिष्ट शब्द निराळ्या रंगात दाखवता येतात.

जर हा कोड तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा असेल, तर अशा प्रकारे सेव्ह करून ठेवा.

YOUR TEXT

वरच्या कोडमधील NAME च्या जागी आवडत्या रंगाचं इंग्रजी नाव आणि YOUR TEXT च्या जागी तुमचा मजकूर लिहिलात की काम झालं.

या रंगीत वाक्यामधे जर लिंक द्यायची झाली तर पुढीलप्रमाणे बदल करावे लागतील.
अमुक गोष्ट करणे हे फार चांगले असते.

यातील हिरव्या रंगात दर्शविलेला कोड रंगासाठीचा अहे, तर निळ्या रंगात दर्शविलेला कोड लिंकचा आहे.

** रंगहीन मजकुरात लिंक कशी द्यायची हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

** मजकुरातील लिंक्स नवीन विंडोत कशा उघडाव्यात हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:
Write comments