Join with us

Thursday, 26 August 2010

मजकूरात लिंक कशी जोडावी

एखाद्या विशिष्ट वेबपेजची माहिती देताना सोबत त्याची लिंक जोडली म्हणजे वाचकांना अचूक संदर्भ मिळतो व आपल्या लेखनामधेही सुसूत्रता रहाते. उदा. अमूक गोष्ट करणे हे फार चांगले असते, या वाक्यासोबत मला ब्लॉगवालेची लिंक द्यायची आहे. यासाठी काय करायचं हे आपण पायरीपायरीने पाहूया.

१. सर्वप्रथ Compose मोड मधे जाऊन हवं ते वाक्य टाईप करून घ्यावं व ज्या शब्दासोबत लिंक जोडायची आहे तो शब्द सिलेक्ट करावा. (खालची दोन चित्र पहा.)
अद्ययावत: आता Compose व HTML हे दोन्ही पर्याय उजव्या बाजूला दिसतील. जो पर्याय निवडलेला असेल तो गडद दिसेल.

२. आता लिंक देण्याच्या पर्यायावर क्लिक करा, म्हणजे एक नवीन विंडो उघडेल.३. या नवीन विंडोमधे सर्वात वर ज्या मजकुरासोबत किंवा शब्दासोबत लिंक जोडायची आहे, तो शब्द दिसेल.४. शब्दासोबत लिंक जोडण्यासाठी Web Address हा पर्याय निवडावा.४. Web Address असं लिहिलेल्या पर्यायासमोरील रिकाम्या चौकोनात हवी असलेली लिंक टाका. (जर लिंकचा पत्ता पाठ नसेल तर ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबार मध्ये पहा. तिथे http:// किंवा https:// सोबत लिंक जोडलेली असते. ती संपूर्ण लिंक तुम्ही कॉपी करायची आहे).५. OK वर क्लिक करा म्हणजे ती लिंक शब्दासोबत जोडली जाईल.Compose मोड मधे ही जोडलेली लिंक दिसत नाही मात्र जर तुम्ही Edit Html या पर्यायावर क्लिक केलंत तर खाली दिल्याप्रमाणे लिंक कशा प्रकारे शब्दासोबत जोडली गेली आहे हे कोडसकट दिसतं.

<a href="http://www.blogwale.info/">अमुक</a>गोष्ट करणे हे फार चांगले असते.


<a href="http://YOURWEBLINK/">YOUR TEXT</a>


वरच्या कोडमधे जिथे http://YOURWEBLINK असं जिथे लिहिलेलं आहे, त्याजागी तुम्हाला हवी ती लिंक देऊ शकता व YOUR TEXT असं लिहिलेलं आहे, त्याजागी तुम्ही तुमचा हवा तो व हवा तितका मजकूर लिहू शकता. तुमचा मजकूर त्या लिंकसोबत जोडला जाईल.

** रंगीत मजकूरात लिंक कशी जोडायची हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

** मजकुरातील लिंक्स नवीन विंडोत कशा उघडाव्यात हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा प्रकारे जर Edit Html मधे जाऊन लिंक जोडायची असेल, तर वरीलप्रमाणे कोड वपरावा.

No comments:
Write comments