
हे काम खूप कटकटीचं वाटतं का? पण अशा प्रकारे इमेजची लिंक दिल्यामुळे तुमची पिकासावरची जागा रिकामी रहाते, जी तुम्ही अतिमहत्त्वाच्या फोटोंसाठी वापरू शकता. शिवाय जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवरून ब्लॉगवर थेट इमेज चढवता, तेव्हा तिथेही आपसूकच एक कोड वापरला जातो, तुम्हाला मात्र तसा कोड वापरला गेला आहे, हे Edit Html या पर्यायात गेल्याशिवाय कळत नाही.
हा कोड असा असतो : <img src="http://your image direct link.jpg">
वरच्या कोडमधील http://your image direct link.jpg – या ठिकाणी तुमच्या इमेजची डायरेक्ट लिंक कॉपी पेस्ट करा म्हणजे तुमची डायरेक्ट लिंक इमेज मधे परिवर्तित होईल.


0 comments
Post a Comment