Join with us

Friday, 9 April 2010

माझ्याबद्दल

कांचन कराई

नमस्कार!

मी कांचन कराई. आरशासारखी स्वच्छ आणि पारदर्शक. मनुष्यस्वभावाचा अभ्यास करणे हा छंद आहे माझा. मराठीच्या प्रसारासाठी निरनिराळ्या माध्यमांतून स्वत:च्या ब्लॉगवर प्रयोग करत असते. स्वत:च्या आवाजात कथा ध्वनिमुद्रित करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत. ब्लॉगवाले हा ब्लॉग सुरू करायचं कधीपासून ठरवलं होतं पण त्याला निमित्त मिळालं ते मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याचं.

मी ब्लॉगस्पॉट/ब्लॉगरचा ब्लॉग वापरते. ब्लॉग सुंदर दिसण्यासाठी कोणते तांत्रिक बदल करता येतील, या माहितीसोबतच मराठी ब्लॉगर्सचे मराठी लेखन अधिकाधिक समृद्ध कसे होईल, या माहितीमधेही भर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. रोज या विषयांवर माहिती मिळताना नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं.

सध्या माझे एकूण पाच ब्लॉग कार्यरत आहेत:

१. मोगरा फुलला - या ब्लॉगवर तुम्ही मी लिहिलेल्या दीर्घकथा, कविता, ललीत लेखन, चित्रपट परिक्षण असं बरंच काही वाचू शकता.

२. i Kreative - नाव इंग्रजी असलं तरी नव्वद टक्के ब्लॉग मराठीतच आहे. तेव्हा बिनधास्त वाचा. हा ब्लॉग मी सर्जनशीलतेला वाहिला आहे. शिका आणि शिकवा या गोष्टीला मी या ब्लॉगवर प्राधान्य दिलं आहे. क्रिएटिव्हीटी, मग ती कसल्याही स्वरूपाची असो, इतरांना त्याची माहिती मिळावी म्हणून मी या ब्लॉगवर लिहिते.

३. पडसाद - हा ब्लॉग सामाजिक व राजकीय घडामोडींना वाहिलेला ब्लॉग आहे.

४. माझी फोटोगिरी - या ब्लॉगवर मी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकली आहेत.

५. ब्लॉगवाले - नवोदित व प्रस्थापित मराठी ब्लॉगर्सना उपयोगी पडेल अशी काही तांत्रीक गोष्टी व विशेष माहीती या ब्लॉगवर संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीत भर घालण्यासाठी इतर ब्लॉगर्सही या ब्लॉगवर आपले लेख व अनुभव येथे प्रसिद्ध करू शकतात.

आणखीही बरंच काही करण्याचा मानस आहे. पण ते जसं वेळ मिळेल तसं. आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच!

ब्लॉगिंगसंदर्भात मला कोणताही प्रश्न विचारण्यासाठी admin@blogwale.info या आयडीवर ईमेल पाठवा.

धन्यवाद!
************************************************

No comments:
Write comments