Join with us

Sunday, 3 May 2009

मजकूरातील अक्षरे तिरकी दाखवण्यासाठी Edit Html कसे वापरावे?

मजकूरातील अक्षरे सरळ किंवा तिरकस दाखवण्यासाठी Edit HTML मधे एक छोटासा कोड आहे. अक्षरे सरळ ठेवण्यासाठी आपल्याला काहीच करावे लागत नाही. नेहमीप्रमाणे लिहित गेलं तरी चालतं. मात्र एखादा विशिष्ट शब्द किंवा अक्षर अथवा एखादं पूर्ण वाक्य तिरकस दाखवायचा असेल, तर तो मजकूर खालीलप्रमाणे लिहावा.

<i>तुमचा मजकूर</i>


वरच्या चौकोनात दाखवल्याप्रमाणे तुमचा मजकूर असं जिथे लिहिलं आहे, तिथे तुमचा हवा असलेला मजकूर लिहा आणि पूर्वदृश्य पहा. खालच्या चौकोनात दाखवल्याप्रमाणे तुमचा मजकूर हे शब्द असे तिरकस दिसायला हवेत.

तुमचा मजकूर


** i या अक्षराचा अर्थ 'आयटालिक' असा आहे.

No comments:
Write comments