Join with us

Tuesday, 10 March 2009

मजकूरातील लिंक्स नवीन विंडोत कशा उघडतील?

कोणताही पोस्ट लिहिताना विषयाशी संबंधित संकेतस्थळाची एखादी लिंक उपलब्ध असेल, तर ती माहितीसाठी जरूर द्यावी. मात्र यामुळे होतं काय, इंटरनेट ब्राऊजर त्यांना त्या संकेतस्थळावर घेऊन जातो आणि मग आपल्या ब्लॉगवरची माहीती पूर्ण वाचलीच जात नाही. कधी कधी वाचक, "नंतर वाचू" असा विचार करून त्या संकेतस्थळाची लिंक बंद करून टाकतात पण त्याचवेळेस आपल्याही ब्लॉगची लिंक त्यांच्या हातातून निसटलेली असते.

यासाठी वाचकांना आपल्या ब्लॉगपासून दूर न जाऊ देता, जर एखादया संकेतस्थळाची माहिती पुरवायची असेल, तर माहितीसाठी देण्यात येणा-या लिंकमधे target blank हे दोन शब्द सामिल करा. आता हे कसं करायचं त्याची माहिती पुढीलप्रमाणे:

समजा, मी खालीलप्रमाणे मजकूर लिहिला आहे.

गुगल हे इंटरनेटवर सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे.


या मजकूरात मला ’गुगल’ ह्या शब्दामधे www.google.com ही गुगल संकेतस्थळाची लिंक द्यायची आहे.

इथे नेहमीप्रमाणे <a href="http://www.google.com">गुगल</a> अशी लिंक दिली आणि गुगल शब्दावर क्लिक केलं, की इंटरनेट ब्राऊजर ताबडतोब गुगलच्या संकेतस्थळाकडे वळेल आणि तुमच्या हातून माझ्या ब्लॉगची लिंक निसटेल. म्हणून मी गुगल ह्या शब्दात लिंक देताना ती पुढीलप्रमाणे लिहिणार आहे.

<a href="http://www.google.com" target="_blank">गुगल</a>

वरच्या लिंक मधे निळ्या रंगात जे target="_blank" असं लिहिलेलं आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. आता अशा प्रकारे लिंक देऊन मी मजकूर लिहिला की तो खाली लिहिल्याप्रमाणे दिसतो.अशा प्रकारे लिंक देऊन मी संपूर्ण वाक्य खाली दर्शविल्याप्रमाणे लिहित आहे.

गुगल हे इंटरनेटवर सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे.

आता वर दिलेल्या वाक्यातील गुगल ह्या शब्दावर क्लिक करून पहा. गुगलची लिंक वेगळ्या विंडोमधे उघडेल. या प्रकारे तुम्हाला लेखामधील कुठल्याही लिंकमधे target="_blank" हा कोड देऊन लिंक निराळ्या विंडोत उघडण्याची सोय करता येते. मात्र हा प्रकार आवश्यक तिथेच करावा. लेखामधील तुमच्याच ब्लॉगवरील सर्व लिंक्स नवीन विंडोत उघडू लागल्या तर वाचकांचा निरस होऊ शकतो, हे लक्षात घ्या.

याच प्रकारे मजकूरातील छायाचित्राला वा प्रतिमेला दिलेली लिंकही वेगळ्या विंडोमधे उघडण्याची सोय करता येते. त्याची माहिती इथे क्लिक केलंत तर वाचता येईल.

No comments:
Write comments