Join with us

Friday, 13 March 2009

प्रतिमेला दिलेली लिंक नवीन विंडोमधे कशी उघडेल?

मजकूरातील लिंक्स नवीन विंडोत कशा उघडतील, हे आपण पाहिलं. आता लेखातील एखाद्या प्रतिमेला दिलेली लिंक नवीन विंडोमधे कशी उघडेल, हे आपण आता पाहू या.

समजा माझ्याकडे एक प्रतिमा आहे.

या प्रतिमेची लिंक पुढीलप्रमाणे आहे: http://i576.photobucket.com/albums/ss210/mogaraafulalaa/100X100MfLogo.jpg अशी आहे.

ही प्रतिमा मला ब्लॉगच्या मजकूरात समाविष्ट करायची आहे व त्या्प्रतिमेसोबत विषयाशी संबंधित अशी http://www.mogaaafulalaa.com ही लिंकदेखील जोडायची आहे.

आता इथे जर मी नेहमीप्रमाणे
<a href="http://www.mogaraafulalaa.com"> <img src="http://i576.photobucket.com/albums/ss210/mogaraafulalaa/100X100MfLogo.jpg" /> </a>
असा कोड दिला तर वाचक माझा हा ब्लॉग सोडून दिलेल्या लिंकमागे जाणार हे नक्की.

म्हणून मी वरच्या प्रतिमेसोबत लिंक जोडताना,
<a href="http://www.mogaraafulalaa.com" target="_blank"> <img src="http://i576.photobucket.com/albums/ss210/mogaraafulalaa/100X100MfLogo.jpg" /> </a>

असा कोड देईन म्हणजे वाचकांनी प्रतिमेवर क्लिक केलं तर उघडणारं पान नवीन विंडोत उघडेल.

खालील प्रतिमेवर क्लिक करून पहा. तिच्याशी जोडलेली लिंक वेगळ्या विंडोमधे उघडते.

No comments:
Write comments