Join with us

Thursday, 5 February 2009

मजकूराच्या रचनेसाठी Edit Html कसे वापरावे?

मजकूराची रचना म्हणजे लिहिलेला मजकूर पानाच्या उजव्या, डाव्या किंवा मध्यभागी बसावा म्हणून केली जाणारी व्यव्यस्था अर्थात Alignment (अलाइनमेंट). Compose मधे मजकूराच्या रचनेसाठी आपल्याला चार चिन्हे मिळतात ती ही :

आता या चिन्हांचे कोड किंवा टॅग्स कोणते कोणते आहेत ते पाहू.
१. पहिले चिन्ह - म्हणजे लेफ्ट अलाईनमेंट. मजकूराचा कल डाव्या बाजूला ठेवणा-या चिन्हाचा टॅग आहे

२. दुसरे चिन्ह - म्हणजे सेंटर अलाईनमेंट. मजकूराचा कल मधोमध ठेवणा-या चिन्हाचा टॅग आहे

३. तिसरे चिन्ह - म्हणजे राईट अलाईनमेंट .मजकूराचा कल उजव्या बाजूला ठेवणा-या चिन्हाचा टॅग आहे

४. चौथे चिन्ह - म्हणजे जस्टीफाय अलाईनमेंट. दोन शब्दांच्या मधील मोकळी जागा व शब्दांची लांबी यांचा समतोल राखून मजकूराची रचना करणा-या या चिन्हाचा टॅग आहे

वरीलपैकी कोणताही टॅग वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला मजकूर
आणि
याच्या मधे टाकायचा आहे, तरच टॅग काम करेल.

उदाहरणार्थ, जर मला

कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणा-या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भुत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

हा मजकूर डाव्या बाजूला कल असेल, (Left Alignment) असा दाखवायचा असेल, तर मी हा मजकूर
आणि
या टॅग्सच्या मधे खाली दाखवल्याप्रमाणे लिहेन

कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणा-या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भुत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

म्हणजे मजकूर प्रसिद्ध होईल तेव्हा तो, खालील प्रकारे पानाच्या डाव्या बाजूकडे झुकलेला दिसेल.

Left Alignment: (मजकूराचा कल पानाच्या डाव्या बाजूला)
कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणा-या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भुत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

टॅग्जमधे बदल केला की मजकूराचा कला निरनिराळ्या दिशेला गेलेला दिसेल.

Center Alignment: (मजकूर पानाच्या मधोमध)
कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणा-या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भुत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

Right Alignment: (मजकूराचा कल पानाच्या उजव्या बाजूला)
कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणा-या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भुत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

Justify Alignment: (शब्दांचा व पानाच्या रूंदीचा समतोल राखून लिहिलेला मजकूर)
कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणा-या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भुत व्हायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

No comments:
Write comments