
Edit Html या पर्यायामधे वर हिरव्या रंगाने दर्शवलेली सर्व चिन्हे कोड अर्थात सांकेतिक शब्दांमधे रुपांतरीत होतात. मजकूराचा आकार, ठळकपणा, तिरकसपणा, अधोरेखित शब्द, रंग, शब्दासोबत जोडण्याची लिंक, अशा चिन्हांचे सांकेतिक शब्द Edit Html या पर्यायात उपलब्ध होतात, जे लेखाच्या रचनेसाठी हवे तसे बदलता येतात. नवीन ब्लॉगलेखकांना किंवा ज्यांना तांत्रिक विषयाचे ज्ञान नसते, अशा ब्लॉगकारांना Edit Html हा पर्याय किंचित कठीण जातो. मात्र, जर लक्षपूर्वक समजून घेतलं, तर हा पर्याय Compose ह्या पर्यायापेक्षा कितीतरी जास्त कामाचा व महत्त्वाचा आहे, हे लक्षात येतं.
No comments:
Write comments