Join with us

Tuesday, 6 January 2009

मजकूराच्या लिपीसाठी Edit Html कसे वापरावे?

ब्लॉगपोस्ट इंग्रजीतून लिहायची असेल तर, ब्लॉगरने आपल्याला ठराविक ७ ते ८ इंग्रजी फॉन्ट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. Arial, Courier, Georgia, Lucida Grand, Times, Trebuchet, Verdana व Webdings अशी या फॉन्टसची नावे आहेत. मात्र या फॉन्ट्सव्यतिरिक्त इतरही बर्‍याच इंग्रजी फॉन्ट्स आहेत, ज्या तुम्ही ब्लॉगलेखनासाठी वापरू शकता. इतकंच नव्हे, मराठीतून ब्लॉगपोस्ट लिहायची असेल तर देवनागरी युनिकोड फॉन्टमधेच लिहावं लागेल, असं बर्‍याच ब्लॉगकारांना वाटतं. मात्र युनिकोड फॉन्ट्सशिवाय ज्या देवनागरी फॉन्ट्स उपलब्ध आहेत, त्या वापरूनही मराठीत पोस्ट लिहिता येऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल, की नवीन पोस्ट लिहिण्यास घेतली की Compose मोड मधे फॉन्टचे वर दिलेले ७/८ पर्यायच दिसतात. मग आपल्या आवडीच्या फॉन्टमधे लिहायचं कसं? मी Edit html हा पर्याय जास्त चांगला आहे, असं जे म्हटलं होतं, ते यासाठीच!

आपल्या आवडीच्या फॉन्टमधे पोस्ट लिहिण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Edit html या पर्यायामधे जावं लागेल. आता पोस्ट लिहिण्यासाठी जिथे रिकामी जागा असते तिथे:

<span style="font-family:आवडत्या फॉन्टचं नाव;">तुमचा मजकूर</span>

असा कोड अक्षरश: कॉपी पेस्ट करून टाकलात तरी चालेल. आता तुम्हाला हव्या असलेल्या फॉन्टचं नाव ’तुमच्या आवडत्या फॉन्टचं नाव’ असं जिथे लिहिलेलं आहे तिथे टाका व ’तुमचा मजकूर’ असं जिथे लिहिलेलं आहे, तिथे तुमचा मजकूर टाईप करून पहा. या लेखनाचं पूर्वदृश्य अर्थात Preview पाहिलात तर तुम्हाला दिसेल की तुम्ही आता तुमच्या आवडत्या फॉन्टमधे लिहू शकता.

**तुम्ही तुमच्या आवडत्या फॉन्टमधे लिहू शकता पण तो फॉन्ट वाचता यावा म्हणून वाचकांकडेदेखील तो फॉन्ट उपलबध असणं गरजेचं आहे.

No comments:
Write comments