Join with us

Thursday, 11 December 2008

ब्लॉगरच का?

ब्लॉगरच का? - In English.

गुगलने आपल्याला Blogger ही सुविधा विनामूल्य ब्लॉग बनविण्यासाठी पुरवलेली आहे. ब्लॉगरच्या तोडीस तोड किंबहुना ब्लॉगरपेक्षा तांत्रिक बाबींमधे कितीतरी सरस अशी सुविधा आपल्याला वर्डप्रेसकडून विनामूल्य मिळते. मात्र, ब्लॉग बनवण्याची इच्छा असलेली प्रत्येक व्यक्ती हया तांत्रिक गोष्टी पटकन समजून घेऊ शकेलच असं नाही. ह्या तांत्रिक निरक्षरतेचा प्रभाव आपल्या ब्लॉग सादरिकरणावर होऊ शकतो. म्हणून ब्लॉगरसारखी, सहज, सोपी शिवाय विनामूल्य ब्लॉग बनविता येणारी सुविधा वापरणे, नवीन ब्लॉगरच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
याशिवाय ब्लॉगरमधे Third Party Widgets, अर्थात बदल करण्यासाठी त्रयस्थ ठिकाणाहून मिळालेले कोड टाकणेही शक्य असते. काही ब्लॉगकारांना ब्लॉग बनविण्याची संपूर्ण तांत्रिक माहिती असूनही, ते ब्लॉगरचाच पुरस्कार करतात, ते याच कारणासाठी!

ब्लॉगर मधे ब्लॉग बनविण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ब्लॉगरमधे आपल्याला जाहिराती लावता येतात. आपला ब्लॉग जर वाचनीय असेल आणि त्याची वाचकसंख्याही समाधानकारक असेल, तर जाहिरात कंपन्या आपल्याला जाहिराती पुरवतात. ज्यायोगे आपल्याला घरबसल्या उत्पन्नाचं साधन्ही मिळू शकतं. म्हणून बहुतांशी ब्लॉगकार, ब्लॉग बनविण्यासाठी ब्लॉगरचाच वापर करतील तर नवल नाही.

No comments:
Write comments