Join with us

Friday, 12 December 2008

पोस्ट कसा लिहावा?

पोस्ट कसा लिहावा? - In English.

ब्लॉग तयार केल्या केल्या पहिला ब्लॉग पोस्ट लिहीता येतो, हे आपण ब्लॉगरमधे ब्लॉग कसा बनवावा? या लेखाच्या सर्वात शेवटच्या परिच्छेदात वाचलं असेल. आता ब्लॉगरमधून लॉग आऊट केल्यानंतर जर पुन्हा लॉग इन केलं, तर नवीन पोस्ट लिहिण्यासाठी New Post असा पर्याय जिथे दिसतो, त्या बटणावर क्लिक केलं की आपोआपच तुम्हाला लेखनासाठी विंडो खुली होते.

पोस्ट लिहिताना, सर्वात वर जांभळ्या रंगातील चौकोनात पोस्टचे शिर्षक लिहावं. मधल्या हिरव्या चौकोनात पोस्टचा मजकूर लिहावा व लाल रेघेने रंगवलेल्या चौकोनात पोस्ट ज्या विषयाशी संबंधित असेल ते नाव म्हणजे लेबल टाकावं. उदाहरणार्थ, तुम्ही जर वडापाव ह्या शिर्षकांतर्गत वडापाव कसा बनवावा याची माहिती दिली असेल, तर लेबल मधे बेसन, बटाटे, चमचमीत अशा प्रकारचे लेबल टाकावेत.

मजकूर लिहून झाला की PUBLISH POST ह्या बटणावर क्लिक केलं की पोस्ट ताबडतोब प्रसिद्ध होईल. जर SAVE NOW ह्या बटणावर क्लिक केलंत तर तुम्ही पोस्ट प्रसिद्ध करेपर्यंतचा सर्व मजकूर त्या पोस्ट मधे जतन केला जातो. अशा प्रकारे तुम्ही पोस्ट जतन करून भविष्यात पोस्ट करण्यासाठी राखून ठेवू शकता.**ब्लॉग सुरू केल्यावर ताबडतोब पहिला पोस्ट लिहिण्यासाठी आवश्यक असलेली ही प्राथमिक माहिती आहे. इतर माहिती पोस्ट लिहिण्यासाठी आवश्यक पर्याय या प्रवर्गात दिली आहे.

No comments:
Write comments