Join with us

Thursday, 11 December 2008

ब्लॉगरमधे ब्लॉग कसा बनवावा?


ब्लॉगरमधे ब्लॉग बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे एक गुगल खाते असणे आवश्यक आहे. www.gmail.com या संकेतस्थळावरील Create an account ह्या पर्यायावर क्लिक केले की आपल्याला खाते बनविण्याची संपूर्ण माहिती मिळते.

एकदा आपल्याला गुगल खाते अर्थात जीमेल अकाऊंट मिळाले की आपल्याला आपोआपच ब्लॉगरच्याही सुविधेचा लाभ घेता येतो. जीमेल अकाऊंट मिळाल्यावर सर्वप्रथम www.blogger.com या संकेतस्थळावर जा. तेथे आपल्या जीमेल अकाउंटने लॉग इन करा.

लॉग इन केलंत की खालच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे Sign Up for Blogger असं लिहिलेली एक विंडो उघडेल.वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जेथे लाल चौकोनात Blog असं लिहिलेलं आहे, तिथे तुमच्या ब्लॉगचं नाव लिहा व त्याखाली I accept the Terms of Service असं लिहिलेल्या पर्यायासमोरील रिकाम्या जागेत खूण करा आणि CONTINUE ह्या बटणावर क्लिक करा. जर तुमचं नाव आधी कोणत्याही ब्लॉगला दिलेलं नसेल किंवा उपलब्ध असेल तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळतो. मात्र जर तुमचं नाव एकमेव नसेल, तर तुमच्यासाठी एक पर्यायी विंडो उघडते.या विंडोमधे तुम्ही सर्वप्रथम पिवळ्या चौकोनात दाखवलेल्या ठिकाणी तुम्हाला हवी असलेली ब्लॉगची लिंक टाका व Check Availability वर क्लिक करून ते नाव उपलब्ध आहे का ते पहा. नाव उपलब्ध असल्यास This blog address is available असा संदेश येईल. त्यानंतर लाल चौकोन दर्शविलेल्या ठिकाणी तुमच्या ब्लॉगला आवडीचं नाव द्या. ब्लॉगची लिंक ही ब्लॉगच्या विषयानुरूप असेल, तर ते वाचकांनाही सोयीचं जातं. उदा. जर तुमचा ब्लॉग चित्रपटांविषयीचा असेल, तर ’चित्रजगत’ असं नाव देऊन तुम्ही ब्लॉगची लिंक chitrajagat.blogspot.com किंवा chitra-jagat.blogspot.com अशी लिहू शकता. मात्र आधी असे नाव उपलब्ध आहे का, याचा check availability या पर्यायवर क्लिक करून शोध घ्या. आता ब्लॉगचं नाव आणि तुम्ही सुचवलेली ब्लॉगची लिंक यांची सत्यासत्यता पडताळून पहाण्यासाठी तुम्हाला हिरव्या चौकोनात जी मोठी व वेडीवाकडी अक्षरे दिली आहेत, ती छोट्या हिरव्या चौकोनात भरावी लागतील. ही अक्षरे भरून झाली की CONTINUE ह्या बटणावर क्लिक करा.

आता तुम्हाला ब्लॉगसाठी टेम्पलेट निवडायची आहे. ब्लॉगरमधे उपलब्ध असलेल्या विविध टेम्पलेटपैकी कुठलीही एक टेम्पलेट तुम्ही निवडू शकता. जर सुरूवातीपासूनच तुम्हाला निराळी आणि आकर्षक टेम्पलेट निवडायची असेल, तर त्याची माहिती इथे दिलेली आहे. ब्लॉगरमधे टेम्पलेट निवडताना शक्यतो Minima किंवा Rounders च्या टेम्पलेट निवडाव्या म्हणजे भविष्यात जर नवीन टेम्पलेट निवडायची झाली तर अडचण येत नाही.आता टेम्पलेट निवडून झाल्यावर तुम्ही CONTINUE ह्या बटणावर क्लिक केलंत की Start Blogging ही विंडो उघडते. ज्यात तुम्ही आपले पोस्ट लिहू शकता.पहिली पोस्ट प्रसिद्ध झाली म्हणजे झाला तुमचा ब्लॉग तयार!


**नवीन ब्लॉग सुरू करताना एखादा प्रायोगिक ब्लॉगही तयार करून ठेवावा. म्हणजे जे काही नवीन प्रयोग वा बदल करायचे आहेत, ते या प्रायोगिक ब्लॉगवर करून पडताळून पहाता येतात.

No comments:
Write comments