Join with us

Wednesday, 10 December 2008

हा ब्लॉग कशासाठी?

हा ब्लॉग कशासाठी? - In English.

आपला ब्लॉग सुंदर व वाचनीय व्हावा, असे प्रत्येक ब्लॉगरला वाटत असते. इंटरनेटवर ब्लॉगसाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या टेम्पलेट्स, थर्ड पार्टी विजेट कोड अशी तांत्रिक माहितीदेखील उपलब्ध असते. आपल्या ब्लॉगमधे कसे बदल असायला हवेत हे देखील ब्लॉगरला माहित असते पण ते बदल कसे करावेत, याचे मुलभूत तांत्रिक ज्ञान मात्र बर्‍याच ब्लॉगर्सकडे नसते. काही नवख्या ब्लॉगर्सना तर असे काही कोड्स उपलब्ध असतात हेदेखील माहित नसते. कित्येक मराठी ब्लॉगर्स तर केवळ इंग्रजी येत नाही म्हणून ही तांत्रिक माहिती वाचायला कचरतात. परिणामी उत्कृष्ट लेखन कौशल्य व सर्जनशीलता असूनदेखील बर्‍याचशा मराठी ब्लॉगर व ब्लॉग्जना हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही व त्यांचे लेखन अज्ञातच राहाते.एक गोष्ट इथे मान्य करावीच लागेल की ही तांत्रिक माहिती पुरवणारे बहुतांश ब्लॉग्ज हे इंग्रजीत आहेत, त्यामुळे इतकी सर्व इंग्रजी माहिती वाचून तो प्रयोग आपल्या ब्लॉगवर करताना इंग्रजीचे जुजबी ज्ञान असलेल्या मराठी ब्लॉगर्सना अडचणीचे जाते. शिवाय तांत्रिक माहिती योग्य प्रकारे समजून न घेता जर वापरली तर आपल्या ब्लॉगचे मूळ स्वरूप बिघडून जाण्याचीदेखील शक्यता असते. मराठी ब्लॉगर्सची ही भिती व संकोच दूर व्हावा यासाठी हा मराठी तांत्रिक ब्लॉग सुरू केला आहे.

माझ्या ब्लॉग्जवर मी जे काही बदल केलेत वा करेन, ते सर्व बदल इतर मराठी ब्लॉगर्सना आपल्या ब्लॉगमधे करता यावेत म्हणून मी सविस्तर व सचित्र माहिती मराठीमधे देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही माहिती मी स्वत: शोधली आहे तर काही माहितीसाठी मला इंग्रजी व मराठी भाषिक ब्लॉग्सवरील बदल पाहून ते बदल आपल्या ब्लॉगवर पडताळून पहावे लागले. काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगवरील बदलांची माहिती मला स्वत: सांगितली आहे. मी त्या सर्व ब्लॉगर्सची आभारी आहे, ज्यांनी ब्लॉगला सुंदर बनविण्यासाठी माहिती देऊन तमाम ब्लॉगर्स समुदायाला मदत केली आहे. या सहाय्यक ब्लॉगर्सची स्वतंत्र लिंक मी इथे दिलेली आहे.


अद्ययावत: दि. १२ ऑक्टोबर २०१३ रोजी.

No comments:
Write comments